शर्वरी कावलकर नीट परीक्षेत यश,भौतिकशास्त्र विषयात 180 पैकी 180 मार्क्स

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

मुनोत ले आऊट येथील रहिवाशी शर्वरी अनिल कावलकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत 720 पैकी 667 मार्क्स मिळविले ती या परीक्षेत जिल्ह्यात दुसरी आली आहे तिचे आल इंडिया रँकिंग 1873 ही आहे तर तीची आल इंडिया ओबीसी रँकिंग 543 ही आहे यात भौतिकशास्त्र विषयात तिने 180 पैकी 180 मार्क्स मिळविले हे विशेष तिला बारावीच्या परीक्षेतही 94 टक्के गुण मिळाले होते नीट परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविल्याने तिला एमबीबीएस साठी चांगल्या शासकीय कॉलेज मध्ये प्रवेश मिळन्याचा मार्ग मोकळा झाला आहे तिला वक्तृत्व स्पर्धेत तसेच चित्रकला स्पर्धेतही अनेक बक्षिसे मिळाली आहेत तिने आपल्या यशाचे श्रेय आजी ,आई वडिलांना दिले तिला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचे आहे राळेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच नीट परीक्षेत इतके मार्क्स मिळाले असल्याने शर्वरी व तिच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.