
सहसंपादक -रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत कापसाचे भाव हे साडेसात हजार ते आठ हजार च्या दरम्यान आहे हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव हे 13 000 किंवा त्यापुढेही राहतील अशा प्रकारचे चित्र तयार केले गेले होते ते आभासी होते का असा सवाल आता शेतकरी करीत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला ठिकठिकाणीच्या बाजार मध्ये कापूस विकला गेला तेव्हा एखाद्या बाजारामध्ये 13000 रुपये विकला गेला किंवा एखाद्या बाजारामध्ये बारा हजार रुपयांमध्ये विकला गेला असे चित्र होते. त्या संबंधित बाजार समितीच्या पट्ट्या सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या त्या पट्ट्या पाहून यावर्षी कापसाला चांगला भाव राहील अशी आशा निश्चित शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती पण जसा हंगाम समोर गेला तसतसे कापसाचे भाव हे दिवसागणिक उतरले आणि आता तर कापूस साडेसात हजारावरती आला आहेत मार्च महिना सुरू आहे व कापसाच्या भावात कुठलीही वाढ होत नसताना दिसत असल्याने निश्चितच शेतकरी चिंतेमध्ये आहे .हंगामाच्या सुरुवातीला भाव वाढीचे चित्र निर्माण झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्याकडील कापूस विकला नाही प्रसंगी शेतकऱ्यांनी गरजेपोटी आपल्याकडे दागिने गहाण ठेवले किंवा त्याने व्याजाने तरी पैसे काढले व आपली गरज भागवली आशा एकच की कापूस जर ठेवला तर भविष्यात कापसाला निश्चित चांगला भाव येईल व गहाण ठेवलेले दागिने किंवा व्याजाने घेतलेले पैसे हे परत करू पण शेतकऱ्याची भाववाढीची अपेक्षा ही पूर्णपणे फोल ठरलि आहेत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की कापसाच्या भाव वाढीचे ठरवून तर कोणी चित्र निर्माण केले नाही ना कारण बियाणे विक्रीपासून तर हवामानाचा अंदाज पर्यंत सर्व गणित मॅनेज केलेले असते उद्देश एकच की आपला फायदा व्हावा त्यामध्ये शेतकरी नाडला जात असेल तरी त्याची चिंता मात्र कोणाला नाही याप्रमाणेच कापसाच्या भाव वाढीचे चित्र निर्माण करण्यामध्ये सुद्धा एखाद्या लॉबीचा हात होता का अशी शंका आता शेतकऱ्याला येऊ लागली आहेत . कारण कापसाच्या भाव वाढीचे आभासी चित्र जर निर्माणच केले गेले नसते तर शेतकरी नेहमीप्रमाणे सुरुवातीला किंवा आपल्या गरजेला जसा कापूस विकतो तसाच त्याने याही वर्षी विकला असता व पर्यायाने शेतकऱ्याचा नुकसान झाले नसते. पण शेतकरी या आभासी भाव वाढीला बळी पडला शेतकऱ्याने आपल्याकडील कापूस अजूनही तसाच ठेवलात व आपल्या पायावर कुराडी मारून घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे .कारण सुरुवातीला कापसाचे 9000 पर्यंत दर होते कापूस भाव वाढीच्या मागे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अनेक कारणे असले तरी सुरुवातीला कापसाच्या भाव वाढीचे जे चित्र निर्माण केल्या गेल्या यामागे कुठल्या लॉबीचे षडयंत्र होते का याची शंका आता शेतकऱ्याला येऊ लागली आहेत व तसे असेल तर भविष्यात शेतकऱ्यांना अश्या गोष्टीपासून निश्चितच सावध राहावे लागेल व आपले नुकसान टाळावे लागेल.
