तालुका रास्तभाव दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना तीन दिवस संपावर


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर :

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने दि. ७,८,९ फेब्रुवारी पर्यंत धान्य दुकान बंद ठेवण्याचा संप पुकारला असून राळेगाव तालुका रास्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेत्या यांनीही या संपात सहभागी होऊन तालुक्यातील तीन दिवस रास्त धान्य दुकान बंद ठेवणार असल्याचे निवेदन तहसीदार यांना दिं ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवारला दिले आहे.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नवी दिल्ली यांनी आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण देशव्यापी संप पुकारला आहे त्यानुसार कोणत्याही रास्तभाव धान्य दुकानदाराने पॉश मशिनी पुर्णपणे बंद ठेवून वितरण करू नये असे आदेश अखिल महाराष्ट्र राज्य रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने आम्हाला देवून या ५७२ तासाच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे. त्या अनुषंगाने राळेगांव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना या संपात तीन दिवस सहभागी होणार असल्याचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश लढे, उपाध्यक्ष सुरेश पेंद्राम, सचिव निखाडे, तथा सर्व सदस्य उपस्थित होते.