सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर व बँक कर्मचारी यांचा भरारी महिला प्रभाग संघ वडकीच्या वतीने सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

महिलाचे सबलीकरण झाले तर महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात मान सन्मानाने उभ्या राहतील या उदात्त हेतूने राळेगाव तालुक्यातील वडकी येथील सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या वतीने भरारी महिला प्रभाग संघांचे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करून महिला सबलीकरणाचा जो आदर्श वडकी सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या वतीने दाखविला गेला त्यामुळे भरारी महिला प्रभाग संघ वडकी च्या वतीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया वडकीचे व्यवस्थापक शेखर कारेकर व सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वडकी च्या वतीनेमहिलाचे सबलीकरण करण्यासाठी ९० समूहास पहिलं कर्ज एक कोटी 90 लाख तसेच दुसरं कर्ज ४६ समूहांना १ कोटी ३८लाखआणि तिसरे कर्ज सहा समूहांना अठरा लाख रुपये तसेच एकूण १४२ समूहांना तीन करोड नऊ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर केल्यामुळे ग्रामीण महिलांच्या वतीने सेंटर बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक माननीय “चंद्र शेखर कारेकर” सर, कृषी वित्त अधिकारी अखिल गजभिये सर, असिस्टंट मॅनेजर रूपाली गायकवाड, मॅडम हेड कॅशियर माननीय घनश्याम मस्के सर ,यांचे भरारी महिला प्रभाग संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी भरारी महिला प्रभाग संघाच्या माजी अध्यक्षा सौ. विद्या मोहन लाड यांनी आपल्या मनोगत व्यक्त करितांना म्हटले की कारेकर साहेब हे एक उत्तम बँक व्यवस्थापक म्हणून कामगिरी करतातच पण ते एक शेतकरी पुत्र असल्यामुळे व त्यांना खेड्याची जाण असल्यामुळे ते खंबीरपणे ग्रामीण महिलांच्या पाठीशी उभे राहून वेगवेगळ्या योजनेची महिलांना माहिती देऊन व बँकेचे व्यवहार कसे करायचे याची वारंवार माहिती देऊन महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.
ते एक उत्तम समाजसेवक सुद्धा आहे कारण हे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
कारेकर साहेबांच्या सामाजिक कार्यामुळे समस्त महिलांच्या मनात त्यांच्या विषयी आपुलकी व आदर आहे.
याप्रसंगी भरारी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ दुर्गाताई वडदे, सचिव वंदना बावणे, कोषाध्यक्ष प्रेमीला करमणकर आणि सौ मनीषा आडे ,कोकिळा कवाडे ,तसेच चाचोरा, आष्टोना, खैरी, सावित्री ,वडकी, झूलर,चहांद,किन्ही जवादे, इत्यादी गावातील महिला उपस्थित होत्या.