महागाव तालुक्यात पावसाचा हाहाकार ; शेतकऱ्यावर आभाळ कोसळले ; एसडीआरफच्या मदतीने हेलिकॉप्टर ने बचाव कार्य ; ४३ नागरिकांना वाचविण्यात यश

आमदार नामदेव ससाणे , माजी आमदार राजेंद्र नजरधने , जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा

महागाव :संजय जाधव


मागील २४ तासापासून महागाव तुफान तालुक्यात पावसाने हाहाकार झाला आहे. तालुक्यात २३१मिमी पावसाची नोंद तालुका प्रशासनाने घेतलीं आहे. ढगफुटी सदृश पावसाने अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेढा घातला.बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीचा माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी आढावा घेतला.शक्य तितक्या लवकर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम पाचारण करण्याच्या सूचना नजरधने यांनी दिल्या.


तातडिने २ एसडीआरफ च्या तुकड्या बचाव कार्यासाठी पाचरण करण्यात आल्या . एसडीआरएफच्या साहाय्याने नागरिकांना वाचवणे शक्य नसल्याची
परिस्थिती लक्षात घेता आ. मदन येरावार, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांच्या बचाव कार्यासाठी छत्तीसगड राज्यातून हेलिकॉप्टर बोलावण्यात आले.

आमदार नामदेव ससाणे ,माजी आमदार राजेंद्र नजरधने आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा डॉ.अंकुश दैवसरकर ,साहेबराव काबळे,राजश्रीताई पाटील , दीपक आडे,सुरेश नरवाडे,नंदू कावळे,विनोद पाटील राऊत अजय पुरोहित,किसनराव वानखेडे,राणू कुरेशी,तेजस नरवाडे,निलेश पाटील नरवाडे सह तालुक्यातील प्रशासनासमवेत तळ ठोकून होते.
तालुका प्रशासनाचे उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड , परी. उपविभागीय महसूल अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार संजीवनी मुपडे, नायब तहसीलदार एस.देशमुख , परि. पोलिस अधिक्षक विनायक कोते . ठाणेदार ढोमणे पाटील, मंडलाधिकारी संजय नरवाडे , राम पंडीत, तलाठी दिपक दिवेकर तालुक्यातील प्रत्येक गावांचे अपडेट घेत होते.

महागाव तालुक्यातील आनंदनगर – अनंतवाडी येथील ६० घरांची वस्ती असलेल्या नागरिकांच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता.त्यामध्ये जवळपास ४३ लोक अडकले होते. हिवरा – खडका दरम्यान असलेल्या शिप नदीला पूर असल्याने वाहतूक सकाळी ६ पासून विस्कळित झाल्याने महामार्ग
पुराच्या पाण्याने बंद असल्याने एसडीआरएफ जवानांना मोठी कसरत करावी लागली .


तत्पुर्वी एसडीआरएफ जवानांनी
धनोडा येथे पाण्यात अडकलेल्या काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत ४ जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात एन डी आर एफ टीमला यश आले.

प्रशासनाने आपत्कालीन स्थिती लक्षात घेता हेलिकॉप्टर लँडिंग करण्यासाठी जागेची चाचपणी केली. नाईलाजाने अखेर खडका येथील राष्ट्रीय महामार्गावर हेलिकॉप्टर लँडिंग करण्यात आले.छत्तीसगढ राज्यातून रायपूर येथून हेलिकॉप्टर नागपूर, यवतमाळ मार्गे येताच अनंदनगर येथे अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर च्या साहाय्याने साडेतीनच्या सुमारास रिस्क्यु करण्यासाठी प्रशासन कामाला लागले.
जिल्हाधिकारी या संपूर्ण प्रकरणावर हजर राहून लक्ष देत होते.

हेलिकॉप्टर लँडिंग करून पुरात अडकलेल्या नागरिकांची माहिती दिली.आणि हेलिकॉप्टर आनंदनगर येथे घिरट्या घालून परत आले.त्यांना रेस्क्यू करणे शक्य नसल्याची माहिती को पायलट ने दिली. प्रशासनाने अखेर एस डी आर एफ च्या जवानांनी रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती देण्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला.
प्रशासनाने आपातकालीन स्थिती लक्षात घेता तालुक्यातील ३ मंगल कार्यालये भाडेतत्त्वावर घेतले.
तिवरंग, गुंज , राहुर , गावात पाणी शिरल्याने घर व दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांत २-३ फूट पाणी होते.महागाव शहरातील प्रभाग ६,१०, आणि २ मध्येही स्थिती गंभीर होत चालली आहे.पाण्याची पातळी वाढत चालल्याने प्रशासन रेस्क्यु टीमला पाचारण केले आहे.

अधर पुस प्रकल्पाचे पाणी पातळी वाढल्याने १० वक्रद्वार ५० सेमी ने उघण्यात आले आहे.त्यामधातून २०० क्युमेक्स ने पाण्याचा विसर्ग होणार असल्याने नदी नाल्याच्या गावांना सतर्कतचाइशारा देण्यात आला आहे.
महागाव शहरातील उमरखेड रोडवरील नागझरी , फुल सावंगी रोडवरील नाल्याला पूर्णपणे पाण्याने वेढले. त्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.नाल्यालगत असलेल्या ३० ते ४० दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घेतली भेट :

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परिसरातील पूर स्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाला सूचना देत परिस्थिती वर मात करण्यासाठी कानमंत्र दिले.तसेच हेलिकॉप्टर आल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी यंत्रणा कामाला लावली..

   

साहेबराव पाटील कदम आणि शिवाजी राठोड यांच्या निवेदनाची तात्काळ दखल

गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यांतील सर्व नदीला नाल्यांना मोठया प्रमाणावर पूर परिस्थीती निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे, यातच तालुक्यातील हिवरा संगम नजिक धनोडा व आनंदनगर भागात एकूण सुमारे ४३ नागरिक संकटात अडकल्याची माहिती समोर येत आहे. या नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासन हतबल झाल्याने हिवरा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव राठोड यांनी आज मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन या नागरिकांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यता असल्याची निवेदनाद्वारे विनंती केली होती.