सचिन वैद्य यांना रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज (योध्दा) महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

माहिती अधिकार,‌ पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया न्यूज 24 यांच्या या नामांकित संघटना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक ५ मार्च २०२३ ला कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कला , सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच राजकीय , क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर जोरगेवार , मराठी फिल्म अभिनेते विजय कुमार खंडारे, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर डॉ. बंडू रामटेके , आयएएस अकॅडमी मा. उषा गीते, केंद्रीय सचिव लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ मा. राजेंद्र देशमुख, डिजिटल सोशल मीडिया अध्यक्ष मा. जितेंद्र चोरडीया , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंडियन रि.पो.असो. नवी दिल्ली मा. संजय कोटे , राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला मा. संजय देशमुख , राष्ट्रीय अध्यक्ष मानव अधिकार मा. अफस कुरेशी , पोलीस मित्र राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे , संपादक इंडिया 24 न्यूज महाराष्ट्र प्रदेश मा. अध्यक्षा (मा.अ.) महाराष्ट्र प्रदेश महिला समन्वयक मा. शिल्पा बनवपुरकर , राष्ट्रीय महिला अध्यक्ष जयश्री सावेडेकर, मुख्य कार्यकारी संपादक इंडिया 24 न्यूज मा. राज जांभुळकर, मुख्य संपादक इंडिया 24 न्यूज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अधिकार राष्ट्रीय उपाध्यक्ष मानव अधिकार मा. तुळशीराम जांभुळकर इत्यादींच्या उपस्थित महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात कार्यरत , उत्कृष्ट कार्य करणारे महाराष्ट्रातील समाजामधील लोकप्रिय मान्यवरांचे सत्कार समारोह आयोजित केले.
अशातच विविध सामाजिक संघटना मध्ये सहभाग सामाजिक चळवळीत कर्तव्यतत्पर , नेहमी अग्रमी , संयमी , रुग्णसेवक , पत्रकार सचिन वैद्य हे सामाजिक क्षेत्रातील विविध जबाबदारी प्रामाणिकपणे नेहमी निसंकोच पार पाडत दिसतात.
वर्धा जिल्ह्यातील छोट्याश्या देवळी गावामधील सर्व सामान्य घरातील सचिन वैद्य व त्यांच्या पत्नी शुभांगी आणि चिमुकली कन्या जिविका यांना ” राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज (योध्दा) राज्यस्तरीय सन्मान “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार ” सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र प्रदान करून मान्यवरांच्या उपस्थित गौरविण्यात आले तसेच थोडक्यात इतिहास म्हणजे या अगोदर सचिन वैद्य यांना कोरोना काळात आदर्श गौरव पुरस्कार 2020/21 , अनेकदा सामाजिक संस्था व राजकीय संघटना यांनी सन्मानित करण्यात आले. कारण सचिन वैद्य हे सन 2013 मध्ये यंग बाईज सामाजिक ग्रुप देवळी तयार करून लोकमान्य टिळक काळापूल देवळी परिसरात स्वच्छता अभियान , व्यक्तिमत्व विकासाचे धडे , समाज प्रबोधन केले व त्यानंतर 2019 पासून संचालक , भारत सामाजिक विकास ग्रुप देवळी यांच्या माध्यमातून स्थानिक झोपडपट्टीमध्ये भटक्या जमातीच्या मुली व मुलांना कला , खेळ , शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न म्हणून “फुटपाथ शाळा” तथा मुख्य संपादक , नव स्वराज्य न्युज सोशल डिजिटल मीडिया नेटवर्क तसेच 2013 पासून होमगार्ड सेवेत कार्यरत सेवा बजावितांना समाज पाहतो आहे. एवढेच नव्हे इतरही सामान्य गरजू लोकांना शक्य होईल तशी धावपळ करीत मदत करतात तर याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे यशस्वीरितेसाठी माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी तसेच विविध कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रलय मशाखेत्री , श्रृती पयन सरकार तर किशोर मुटे यांनी आभार प्रदर्शन केले.