
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे यावर्षी रामनवमीच्या पर्वावर समाजमनावर बिंबवणारा, आपलंही काही समाजाला देणं लागतं, दिनदुबळ्याची मदत करणं हे सुद्धा मनुष्य म्हणून आपलं कर्तव्य आहे याचा प्रत्यय म्हणून गावातील एका गरीब परीवारातील मुलीचा लग्नाचा संपूर्ण खर्च करून आणि संपूर्ण गावातील लोकांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे पार पाडून या गावात म्हणा किंवा तालुक्यात म्हणा वेगळा आदर्श निर्माण केला असून त्या एका तरुण पोलिस पाटलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा विवाह एका गरीब परीवारातील मुलीचा असून या कार्यक्रमाला कमीतकमी एक लाखाहून अधिक रक्कम खर्च करून या परिवाराला मोठा दिलासा दिला असून या उपक्रमात गावातील तरुण नवयुवक, जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक, महिला भगिनींनी सर्वच स्तरावर सहकार्य केले.हा विवाह सोहळा गावातील राजू मांढरे यांची कन्या दिपाली हिचा असून या परिवाराला आर्थिक संकटामुळे मुलीचे लग्न कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला होता ही गोष्ट झाडगावचे तरूण पोलिस पाटील,ज्यांचा प्रत्येक सामाजिक कार्यात फुल ना फुलाची पाकळी असा वाटा नियमित असतो असे मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक स्व.लखूजी वाणी यांचे चिरंजीव तथा पोलिस पाटील प्रशांत वाणी यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी राजू मांढरे यांचे घर गाठले आणि त्यांना लग्नासाठी दिलासा दिला.अशाप्रकारचा उपक्रम हा पाचव्यांदा राबविला असून या सामाजिक उपक्रमात गावातील सर्व स्तरातील लोक, सामाजिक कार्यकर्ते, गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, राळेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, यांच्या हस्ते पोलिस पाटील प्रशांत वाणी यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याबाबत प्रशांत वाणी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता गरजू लोकांना मदत,गरजू परिवारातील मुलींचा विवाह सन्मानाने व्हावा हिच माझी प्रामाणिक इच्छा असून मी करत असलेल्या या उपक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य लाभले असून भविष्यात सुद्धा हा उपक्रम मी माझ्या पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले.
