
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पवनार : येथील ग्रामपंचायतीने सलग तिसरा वर्षी टीबीमुक्त सुवर्णपद टीबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून सुवर्ण पदक पटकावले आहे. जागसलग तिसरा वर्षी टीबीमुक्त सुवर्णपदकतिक क्षयरोग दिवसानिमित्त ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. अक्षय इंगळे,समुदाय आरोग्य अधिकारी वासुदेव राऊत ग्रामविकास अधिकारी यांच्या
मार्गदर्शनाखाली गावाने टीबी निर्मूलनासाठी उपाययोजना प्रभावी राबविली. त्याबद्दल गौरव मिळाला. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायती नेदेखील मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थ, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पवनारने हा सन्मान पटकावला.
मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, डॉ. रॉबिन कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावामध्ये नेहमी क्षयरोगविषयी जनजागृती रॅली काढली जाते. होणारा प्रादुर्भाव, औषधी, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय, याविषयी सर्वेक्षण करून माहिती सांगितली जाते. आरोग्य तपासणीसाठी एक्स-रे काढण्याकरिता जिल्हा रुग्णालय येथे पाठवले जाते. गावामध्ये २९५ लोकांची तपासणी झाली. त्यात सात रुग्ण औषधोपचार घेत आहे.
