वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगांव यांचा भव्य जन आक्रोश मोर्चा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दिनांक ३.१०.२०२३रोजशुक्रवारला विविध प्रकारच्या मागण्या साठी उपविभागीय कार्यालय राळेगांव येथे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शासनाने सरकारी नोकर भरतीचेआणी सरकारी शाळांचे जे खाजगीकरण केले तो जि.आर.रद्द करण्यात यावा, स्पर्धा परीक्षेची परिक्षा शुल्क शुन्य करण्यात यावि, महिला वरील अत्याचार विरोधी कायदयाची कडक अमलबजावणी करण्यात यावि, शेतकऱ्यांच्या कापसाला १५०००/व सोयाबीन ला १००००/₹प्रतीक्विंटल भाव देण्यात यावे, वनजमिन अतिक्रमण धारकांना हक्काचे पट्टे देण्यात यावे, पेसा कायदयाची कडक अमलबजावणी करण्यात यावि, ओबीसी व अनुसूचित जनजाति मध्ये ईतर प्रवर्गाला समाविष्ट करण्यात येऊ नये,जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण देण्यात यावे, घरकुलाला सरसकट ग्रामीण व शहरी भागाला तिन लाख रुपये देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी राळेगांव चे विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश फुलमाळी, तालुका अध्यक्ष विकास भाऊ मुन, महासचिव प्रकाश कळमकर, पूर्व चे जिल्हा उपाध्यक्ष धनराज लाकडे, शहर अध्यक्ष दिपक भाऊ आटे, तालुका उपाध्यक्ष राहुल उमरे, आष्टा शाखा अध्यक्ष अजयदारुंडे, शहर उपाध्यक्ष संतोष घनमोडे, युवा कार्य करता लोकेश दिवे, प्रतिभा ताई वरटकर, सिमाताई दिवे, महिला आघाडी राळेगांव चे महासचिव सुरेखा ताई वाघमारे, साधना ताई गांजरे, कळंब शहर अध्यक्ष सुगतजी नारायणे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष धम्मावतीताई वासनिक, महासचिव सरला चचाने, करुणा मुन, करूणा चौधरी, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगेसाहेब, प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे,सुनिल ढोरे, सुगतजी फुलमाळीईत्यादी कार्य करता हजर होते. तर गोंडवाना गणतंत्र पार्टी चे महाराष्ट्र कार्यध्यक्ष बळवंतराव मडावी, जिल्हा अध्यक्ष विशाल वाघ, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष विजयाबाई रोहणकरमॅडम, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल धुर्वे, जिल्हा संघटक हर्षल आडे, तालुका अध्यक्ष वर्षाताई आडे, संगिता कुळसंगे,महाराष्ट्र सचिव उईके मॅडम ,जयश्री मेश्राम, ज्ञानेश्वर कुमरे, शहर अध्यक्ष उमेश उईके असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.