
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ( ग्रामीण) :शैक्षणिक धोरणानुसार शाळा भौतिक सुविधायुक्त असाव्या त शासन निर्णय असतानाही आता नुकतीच जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारत क्रमांक दोन तिला सुरू होऊन वर्षे झाले परंतु विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून इथे कोणतेही भौतिक सुविधा उपलब्ध नाही. वास्तविक हे मुलींच्या दृष्टिकोनातून येथे स्वच्छतागृह व शौचालय आवश्यक होते. तसे ठरावही ग्रामव्यवस्थापन समितीने घेतले परंतु ते वर वरिष्ठापर्यंत पोहोचले की नाही हे मात्र कळू शकले नाही. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत ला याची जाणीव आहे परंतु पंचायत समिती व ग्रामपंचायत दोन्ही विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या शाळेत जवळपास 40 च्या वर मुली आहे आणि ही रायगाव तालुक्यातील मुला मुली सहित सर्वोच्च शाळा आहे त्यामुळे या शाळेला प्राधान्य देऊन मुलींच्या दृष्टिकोनातून इथे शौचालय व स्वच्छतागृह मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. मुलींसाठी शौचालय हा महत्त्वाचा भाग असून शाळा सुरू होऊन एक वर्ष झालं तरी ह्या सुविधा का उपलब्ध झाल्या नाह हे काय राजकारण आहे हा समजायला मार्ग नाही
या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी व गरीब विद्यार्थी असून या शाळेत सर्वसामान्यांची मुले सुद्धा शिकत आहे. या सुविधा बाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखडे यांनी वारंवार तोंडी तोंडी सूचना गटविकास अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी, गटविस्तार अधिकारी व ग्रामपंचायत या संबंधित अधिकाऱ्यांना दिले असताना सुद्धा या संबंधित अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून शालेय विद्यार्थ्यांना या भौतिक सुविधा पासून वंचित ठेवले. वास्तविक शाळेच्या मासिक मीटिंगमध्ये या विषयावर वारंवार ठराव होऊन हे ठराव वरिष्ठापर्यंत पोहोचत आहे की नाही याची सुद्धा माहिती कळायला मार्ग नाही. हे शिक्षण विभाग हा चापलोशी करणाऱ्या अधिकाऱ्यासोबतच आहे की काय अशी परिस्थिती तालुक्यात दिसत आहे, तरी तरी इमानदार अधिकाऱ्याने या गंभीर बाबीकडे या भौतिक सुविधा शालेय विद्यार्थ्यांचे हितासाठी त्वरित पूर्ण करावया व चॅप्लूसी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कामाप्रती तालुक्यात तत्पर असणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या व शाळाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी अशी खैरी शाळा व्यवस्थापन समिती व खैरी गावातील पालक वर्गाची मागणी आहे. कारण की शिक्षक क्षेत्रात भोंगळ कारभार चालला आहे असे दिसते कारण रायगाव तालुक्यातील अभियंता यांनी कधी शाळेकडे येऊन शाळेला कशाची आवश्यकता आहे याची पाहणी सुद्धा अजून केलेली नाही तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारत क्रमांक एक यामध्ये पोखरून खूप मातीवर काढली असून तिथेच शालेय पोषण आहाराचे साहित्य सुद्धा ठेवलेले आहे तेव्हा याकडे राळेगाव शिक्षण विभागाने लक्ष देऊन तात्काळ जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक एक च्या तीन खोल्या इमारत क्रमांक दोन मध्ये मुली व मुलांसाठी स्वच्छतागृह व शौचालय याची बांधणी करावी कारण की इमारत क्रमांक दोन मधील स्वच्छालय तर धुलीस मिळाला आहे. तसेच स्वच्छतागृह हे नावालाच आहे ते केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही कारण की इमारत जवळपास दहा वर्ष बंदच होती नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुशाल वानखेडे यांनी पालकमंत्र्याकडून निधी आणून ती इमारत सुरू केली .मात्र शौचालय व स्वच्छतागृह निधी अभावी राहिले. याबाबत ग्रामपंचायत तर व पंचायत समिती स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी भरपूरदा तोंडी सूचना केल्या तसेच मासिक मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आले मात्र ते वरिष्ठापर्यंत पोहोचले की नाही हे कळाले नाही. तरी त्या गंभीर बाबीची दखल घेऊन वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यवाही करावी व जिल्हा परिषद केंद्र शाळा इमारत क्रमांक एक येथील खोल्या व इमारत क्रमांक दोन मधील स्वच्छतालय व शौचालय त्वरित बांधून देण्यात यावे अशी शाळा व्यवस्थापन समिती, व पालक वर्गाची मागणी आहे. तेव्हा प्रशासन त्या गंभीर बाबीची दखल केव्हा घेतात याकडे खैरी ग्रामवस्यांचे लक्ष लागले आहे.
