

पो. स्टे. वडकी हद्दीतुन कत्तलीसाठी गोवंशाची हैद्राबाद कडे अवैद्यरीत्या वाहतुन करुन घेवुन जात असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाल्याने हद्दीतील देवधरी घाटात सापळा रचुन आयशर क्र. MP 20 GA 9564 या वाहनास थांबण्याचा ईशारा केला असता, त्याने सदर ठिकाणाहुन पळ काढुन उमरी, रुंजा, करंजी मार्गे वडकी कडुन नागपुर कडे पळुन जात असतांना वर्धा नदिच्या पुलावर दोन्ही कडील वाहतुक थप्प करुन सदर वाहन पकडुन सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 33 गोवंश आढळुन आले, प्रत्येकी किंमत 20,000/- रु. प्रमाणे असे एकुण 6,60,000/- रु किंमतीचे गोवंश आणि 20,00,000/- रु किंमतीचा आयशर वाहन असा एकुण 26,60,000/- रु किंमतीचा मुद्देमाल यातील आरोपी नामे मो. नसीम मो. यासीन हन्सारी रा. हमीद नगर नागपुर यांचेसह ताब्यात घेतला आहे. सदर आरोपीतांवर कलम 325 भारतीय न्याय संहीता सहकलम 5, 5(अ), 5(ब) महा. प्राणी संरक्षण अधीनियम सहकलम 11 प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम. अन्वये गुन्हा दाखल करुन पुढिल कार्यवाही करीत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता सा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात सा. आणि सहा. पोलीस अधीक्षक उपविभाग पांढरकवडा श्री. रॉबीन बन्सल सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. वडकी येथील ठाणेदार सपोनि / भोरकडे सा. सोबत पोउपनि / कुडमेथे, चालक सफौ / 716 मडकाम, पोहेकाँ / 2214, नापोकाँ / 2386, पोकाँ/1111, पोकाँ/2383 तसेच पो. स्टे. पांढरकवडा येथील पोउपनि / सुशीर यांनी केली.
ठाणेदार पो. स्टे. वडकी
