पोंभूर्णा तालुक्यात युरिया खताची मोठी टंचाई ?, तात्काळ युरिया खत तालुक्यात उपलब्ध करण्याची शिवसेनेची निवेदनातून मागणी

▪️

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांचे आदेशाने,शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीन मते यांचे सूचनेनुसार उप जिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला, बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांचे मार्गदर्शनात पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,शहर प्रमुख संतोष पार्लेवार,यांचे नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

पोंभूर्णा तालुका हा शेतकरी तालुका असून या तालुक्यात शेतीविना दुसरा कुठलाही पर्याय नाही.तालुक्यात इतरत्र कुठलीही सुविधा नाही.तालुक्यातील जनता ही शेतीवर अवलंबून आहे, येथील शेतकरी राजा मोठ्या संकटात आहे.एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे मोठमोठे निर्णय घेत आहे. आज शेतीसाठी युरिया व इतर खतांची गरज असून तालुक्यात खत उपलब्ध नाही.ग्रामीण भागातुन अनेक शेतकरी निदान आज तरी खत मिळणार मोठ्या आशेने पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी येतात.पण शेतकरी राजा हा नाराज होऊन परतिच्या वाटेने वापस जात आहे.तालुक्यात धान,कापूस, तुळ,सोयाबीन,मिरची अनेक प्रकारची पिके घेतली जातात पण शेतकऱ्याला शेतीसाठी युरीया खत उपलब्ध नाही.ही शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेवून तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांना पोंभूर्णा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युरिया व इतरत्र खत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची निवेदनातून मागणी केली. यावेळी,तालुका सन्वयक व्यंकटेश चिपावार,वेदप्रकाश आगरकर, सतीश बावने,गंगाधर डोनेवार सह शेतकरी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.🔅