

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव पासून जवळच असलेल्या गुजरी नागठाणा येथील लक्ष्मी माता मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञाची सांगता ,दिनांक 15/ 3 /2024 शुक्रवार ला संपन्न झाली. श्रीमद् भागवत कथा चे वाचन 07 ते 15 मार्चपर्यंत ह भ प प्रल्हाद महाराज शास्त्री भागवतचार्य चिकणी डोमगाव, तालुका दारव्हा यांच्या अमृतवाणीतून सकाळी 09ते 11 व दुपारी 03 ते 05 या कालावधीत करण्यात आली. श्रीमद् भागवत कथेनिमित्त ग्रामसफाई सामुदायिक ध्यान, काकडा ,रामधून ,ग्रामगीता वाचन खंजिरी भजन, कीर्तन ,सर्व रोगनिदान शिबिर, कलश यात्रा दीप यज्ञ, गायत्री महायज्ञ ,डायका गोंधळ ,सामुदायिक प्रार्थना, गुजरी नागठाणा येथील अपंग व्यक्तींचा, सेवानवृत्त व्यक्तींचा शासकीय सेवेत सेवा करीत असणारे ,तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कुटुंब प्रमुखांचे सांत्वन 2023 मध्ये लग्न झालेल्या मुला मुलींचा ,तालुक्यातील पत्रकारांचा भागवत सप्ताहात बाहेरगावातील सहभागी व्यक्तींचा मान्यवरांचा सन्मान .रांगोळी स्पर्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा, हरिपाठ, भारुड,, गावातील मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध विषयांवर प्रवचन प्रबोधन राधे राधे च्या गजरात मंदिर परिसरात मंदिर परिसर भक्तीमय झाला होता या सप्ताहात दैनंदिन हरिकीर्तनाच्या कार्यक्रमात हभप पंढरीनाथ ठाकरे वेणी जागोना ह भ प चंद्रकांत महाराज कापशीकर कापसी ,ह भ प नामदेव महाराज वाडही निधोरा ,हभप गोपाल महाराज बोरसरे वडकी, ह भ प अरुण भाऊ सालोडकर आडगाव खाकी ,ह भ प अरुण खंगार खैरी, ह भ प गजानन महाराज सुरकर सावंगी ,नामवंत कीर्तनकाराची कीर्तन झाली. या सप्ताहात सप्त खंजिरी वादक पंढरीनाथ ठाकरे जागोना यांची कीर्तन व शेडी माड येथील श्री ठाकरे व संच मंडळ यांचा हरिपाठ झाला .सप्ताहाचे शेवटी गावाच्या मुख्य मार्गावर टाळ मृदंगाच्या गजरात भव्य पालखी काढण्यात आली. पालखीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचे भजन करून टाळ हाती घेतले. होते गावातील महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढून पालखीची शोभा वाढविली होती तर अकरा वाजता काल्याचे किर्तन भागवताचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या वाणीतून होऊन त्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. या समारोपिय कार्यक्रमाला समस्त ग गुजरी नागठाणा गावातील नागरिक ,मान्यवर प्रमुख पाहुणे तसेच सर्व आमंत्रित भजन मंडळ हे उपस्थित होते .गुजरी नागठाना गावात अवैध दारू विक्री व हातभट्टी दारू काढणे या बाबत बंदी झाल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले .नंतर महाप्रसादाची वितरण करण्यात आले .या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला सप्ताहाला जिल्ह्यातील तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते हे विशेष. सप्तहाचे यशस्वीतेसाठी गुजरी नागठाना येथील गावकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले .
