
सहसंपादक: रामभाऊ भोयर
गरीब घटकास भूक भागविण्याकरिता अन्नधान्य मिळावे, याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशन दुकानातून रेशनकार्डधारकांना नियमित तांदूळ, गहू, डाळ व सणाच्या दिवसांत आनंदाचा शिधा वितरण केले जात असे; परंतु गेल्या दीड वर्षापासून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना फक्त गहू, तांदूळ मिळत असून आनंदाचा शिधा, डाळ, साखर बेपत्ता झाली आहे.
यामुळे गरिबीखाली जीवन जगणारी निराधार जनता त्रस्त झाली असहसंपादक: सून पुढील येणाऱ्या सणासाठी आनंदाचा शिधा मिळणार काय? या आशेने लाभार्थी प्रतीक्षा करीत आहेत.
राळेगाव तालुक्यात ११४ रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून प्राधान्यचे १६ हजार २७९ व अंतोदय गट योजनेचे ७ हजार ६३९ असे एकूण २२ हजार ९१८ लाभार्थी आहेत. या सर्वाना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीच्या सरकारने सण उत्सवकाळात आनंदाचा शिधा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमातून गोरगरिबांना शंभर रुपयात शिधा दिला जात होता. यामुळे यामुळे गोरगरीब जनता दसरा दिवाळी सनद गोडधोड करून खात होते परंतु मागील व दीड वर्षापासून आनंदाच्या शिधाला विरम लागला असल्याने गोरगरिबांनी शासनाच्या या योजनेविषयीची नाराजी व्यक्त केली आहे.आता फक्त गहू आणि तांदूळ रेशन दुकानात मिळू लागले. यामुळे सामान्य जनतेला इतर महागडी साखर, तेल, डाळ दुकानातून विकत घ्यावी लागत आहे. आता तर चक्क मागील महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात गहू ऐवजी ज्वारी मिळत असल्याने आणखीच गरिबांच्या सणावर विरजन पडले असून गरिबांना गहू विकत घ्यावे लागनार आहे यामुळे आणखीच लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आनंदाचा शिधा अचानक बंद का झाला
लाभार्थ्यांना आनंदाचा सिद्ध किटमार्फत १०० रुपयात साखर पामतेल रवा मैदा तूरडाळ प्रत्येकी एक किलोची किट मध्ये हा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जात होता त्यानुसार २०२२ पासून दिवाळी गुढीपाडवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती या सणात दिला जात होता परंतु २०२४ पर्यंत आनंदाचा शिधा मिळाला त्यानंतर मात्र शिधा मिळणे बंद झाले असून शासनाने याबाबतचा संबंधित विभागाला बंद झाल्याचा कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार झाला नसून अचानक आनंदाचा शिधा बंद का झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
