फुलसावंगीत शॉर्ट सर्किट ने तीन दुकाने जळून खाक,लाखोंचे नुकसान

फुलसावंगी प्रतिनिधी: संजय जाधव

फुलसावंगी येथील किनवट रोडवरील बसस्थानक परिसरातील काल रात्री (गुरुवार)११ वा चे दरम्यान अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली
या आगीत एका ऑटोमोबाईल शॉप ला शॉर्ट सर्किट ने आग लागली दुकानात ऑइल असल्याने आगीने लगेच रौद्र रूप धारण केले त्यामुळे बाजूलाच असलेले एक वेल्डिंग वर्कशॉप,आणि त्यातील महागड्या मशिन्स जळून खाक झाल्या, तसेच एक हॉटेल सुद्धा जळाले, आगीची माहिती मिळताच गावकर्यांनी अग्निशमन दलाला फोन केला असता,उमरखेड,आणि माहूर च्या दोन अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या अग्नी तांडवा वर नियंत्रण मिळविले घटनास्थळी महागाव चे नायब तहसीलदार एस, आर देशमुख ,ठाणेदार दीपक धोमणे पाटील ,राजू वैद्य लिपिक आणि ग्रामपंचायत सदस्य कुणाल नाईक,इम्रान पठाण हे तातडीने पोहचले होते
यात ऑटोमोबाईल आणि वेल्डिंग शॉप व हाटेल यांचे बरेच शे नुकसान झाले आहे