
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव गणेश उत्सवापासून दिवाळी पर्यंत सनासुदिचे दिवस आहे या दिवसात नागरीकांना खरेदी जास्त करावी लागते नेमके याच सणासुदीच्या दिवसात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे खाद्य तेलासह किराणा मालाच्या प्रत्येक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे याची झळ श्रीमंतापेक्षा सर्वसामान्य माणसाला पोहचत आहे एकंदरीत महागाई मुळे गरीबांपुढे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे
गणेश उत्सव, नवरात्र, दसरा संम्पल्यानंतर दिवाळी सन काही दिवसावर आला आहे ऐन दिवाळी समोर असताना महागाई प्रचंड वाढली आहे भाजीपाला, फळवर्ग, खाद्य तेलासह किराणा मालाच्या प्रत्येक वस्तूंचे दर वाढले आहे वाढत्या महागाई मुळे सर्व सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे वाढती महागाईचा परीणाम फक्त गरीबांवर होत आहे शेतकरी, शेतमजूर, कामगार, या महागाईत भरडला जात आहे सरकारी कर्मचारी वर्गाला तर वाढत्या महागाईचा विचार करून महागाई भत्ता दिल्या जातो, व्यापारी वर्गाला त्याच्या एम आर पी नुसार दर आकारण्याचे स्वातंत्र्य दिल्या जाते शेतकऱ्यांना स्वताच्या शेतीमालाचे दर आकारण्याचे स्वातंत्र्य तर सोडा शासनाने दिलेला हमीभाव सुध्दा त्याला मिळत नाही हि परस्थिती आहे सत्ताधारी, विरोधक लोकप्रतिनिधी यांन तर सर्व सुखसोयी फुकटात उपलब्ध करून देण्यात येते त्यामुळे महागाईचे नाते श्रिमंतापेक्षा गरीबाशी जोडल्या गेले आहे या देशाची अर्थव्यवस्था शेतकरी, शेतमजूर, कामगार,सर्व सामान्य जनता यावर अवलंबून आहे त्यालाच आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत आहे आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न घेणार व्यापारी, कृषी केन्द्र चालक कारखानदार या श्रीमंत लोकांनी आत्महत्या केल्याचे ऐकले नाही मात्र देशाचा पोशिंदा दररोज आत्महत्या करतो हि दूरदैवी बाब आहे गरीबांचे अच्छे दिन येणार कधी हा प्रश्न निर्माण होत आहे
