
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
कळंब :-कनिष्ठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कडा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला
संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच संविधान गीताचे गायन करण्यात आले.संविधान दिना निमित्त प्रभात फेरी, प्रश्न मंजुषा स्पर्धा, उद्येशिका लेखन, विद्यार्थी भाषण घेतले विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वेश परिधान करून आले होते.
संपूर्ण मार्कडा गावातून भारतीय संविधान प्रतिमा हातात घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व संपूर्ण पालक वर्ग यांनी सहकार्य केले. शाळेतील मुख्यधापिका वैशाली उईके (मंगाम) सहाय्यक शिक्षिका शीतल चौधरी उपस्थित होते.
