
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी एक राजकिय चळवळ असुन जनसामान्य लोकांसाठी लोकहितासाठी सदैव काम करणारे तसेच सामाजिक कार्यात चांगली कामगिरी असल्यामुळे राळेगाव शहरातील सुपरिचित इमरान खान पठाण यांची नुकतीच पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,मा.क्रिडा राज्यमंत्री संजय भाऊ देशमुख, तसेच राळेगाव विधानसभा संपर्कप्रमुख मा. संदिप दादा देशमुख आणि यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख मा.राजेंद्र भाऊ गायकवाड, मा.जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर,जिल्हा प्रमुख संतोष भाऊ ढवळे, मा.तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, मा.माजी शहरप्रमुख राकेश भाऊ राउळकर यांच्या सौजन्यपुर्ण मार्गदर्शनाखाली राळेगाव विधानसभा क्षेत्रात राळेगाव शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे संपूर्ण राळेगाव शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
