

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे विरंगना महाराणी दुर्गावती मडावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,भारताच्या गौरवशाली गोंडवाना साम्राज्याच्या शूर साम्राज्ञी,वीरांगना महाराणी दुर्गावती मडावी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी महाराणी दुर्गावती मडावी चौक, धानोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल गेडाम यांच्या हस्ते वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राणी दुर्गावती यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांचे राष्ट्रप्रेम,आत्मत्याग आणि नेतृत्वगुण यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस. एम. फिजिकल अकॅडमीचे संस्थापक प्रफुल गेडाम प्रमुख वक्त्या गायत्री कंगाली,प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष डाँ.कुणाल भोयर,उपसरपंच विशाल येणोरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चकोले, कैलास कोडापे (पत्रकार), डाँ.शामसुंदर गलाट,विशाल साखरकर,चंद्रशेखर कामडी या सर्व पाहुण्याच्या हस्ते विरांगना महाराणी दुर्गावती पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले,व पाहुण्यानी मनोगत व्यक्त करून व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली व तसेच विरंगणा महाराणी दुर्गावती उत्सव समिती यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम पार पाडला.
