
.
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कृष्णापुर पंचायत समिती उमरखेड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी जल्लोषात शाळा प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची सुरुवात करण्यात आली.
शैक्षणिक वातावरण व जागृतीसाठी शाळेतर्फे गावांमध्ये नवागत विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून ढोल ताशांच्या गजरात पालकांच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प ,पाठ्यपुस्तके व खावू देऊन त्यांचे शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा विविध पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. मध्यान्ह भोजनात नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना गोडभात देवून करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उमरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जळके, उपाध्यक्ष दयानंद जळके व समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर धात्रक ह्यांनी केले गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले व गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शैक्षणिक जनजागृती करिता स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन विद्यार्थी व गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन राठोड यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर धात्रक, शिक्षक आनंद कुंबरवार , संजय मांजरे, शिवाजी गिरी, तानाजी मार्लेवाड, तानाजी बास्टेवाड, मनोज कोकांडे, अनिता देशमाने, रवि फुलेवार यांनी परिश्रम घेतले.
