
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
खडकी शिवारात असलेल्या अनिल धोबे व त्यांच्या भावाचे शेत लागलेले आहे. दिनांक ३ एप्रील २०२२ च्या रात्री कोणी अज्ञाताने शेतात वनवा लावून दिला यात त्यांच्या शेतात असणारे ओलोताचे पाईप दोन विहीरीतील मोटर ज्या बाहेर काढून ठेवल्या होत्या शेतातील बांबू सागाचे झाड . जळाले जवळ पास दोन लाखाचे नुकसान झाले आहे . हा वनवा बाजूच्या . शेतात ही लागला दुसऱ्या दिवशी सोनामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल धोबे शाळेत आले शाळा संपल्यानंतर शेतात गट सर्व्हे नं ९१ / १ . ९१ / २ . ९१ /3 गेले पाहता तर शेतात आगेच्या विळख्यात सापडून शेत उपयोगी वस्तू जळाल्या चे दिसले वडकी पो स्टे ला माहीती दिली पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे . झालेले नुकसान शासनाने द्यावे व शेतात वनवा लावणाऱ्यास शोधून कारवाई करावी अशी मागणी अनिल धोबे यांनी केली आहे .
