
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कुर्ली येथील शेतात काम करून घरी परत येत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ता. १२ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. कुर्ली येथील विशाल मारोती गायकवाड ३४ असे मृत्यपावलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
आज दुपारी कुर्ली शिवारात मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने हजेरी हजेरी लावण्याचे शेतकरी विशाल यांनी आपले शेतकाम बंद केले व ते घरी परत येत असताना त्यांचे अंगावर वीज कोसळली व त्यांच्या जागीच मृत्यू झाला. त्यांचे मागे वआईवडील,पत्नी, व दोन मुली असा आप्त परिवार असून घरचा कर्ता व्यक्ती निघून गेल्याने गायकवाड कुटुंबावर संकट निर्माण झाले आहे. त्यांच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
