
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
हल्ली आपण बघतोच आहे साधे ग्रामपंचायत सदस्य किंवा राजकीय छोटीशे पद आले म्हणजे लगेच अहंभावी वृत्ती जागृत होऊन सर्वसामान्यांना बगल देण्याचे काम होताना आपण बघतोच आहे ५ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित विष्णुदासजी वर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला एवढे महत्त्वाचे पद सांभाळत असताना सर्वांच्या समस्या शांततेने आणि संयमान ऐकून घेऊन व विश्वासात घेऊन व कोणत्याही व्यक्तीला न डावलता न दुखवता त्याचे म्हणणे हे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यांची समस्या कशी सुटेल यावरच रोहित वर्मा यांचा भर असतो त्यांच्या याच कामामुळे त्यांनी हे पदरुपी धनुष्य पेलले व हीच त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल.
तसेच कुंभमेळ्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांचे पाद्य पूजन केले व त्यांच्या प्रती ऋण भाव व्यक्त केले आणि बहुदा आपल्या नेत्याचे आपल्यावर असलेल्या संस्काराची चुणूक त्यांनी यावेळेस दाखवून दिली यावेळी वाढदिवस साजरा झाला त्याप्रसंगी नगरपंचायत महिला सफाई कामगारांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांनी केलेल्या सुसंस्कृत संस्काराची यावेळी जाण होते हे विशेष. ढाणकी परिसरातील अनेक राजकीय निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी वेळोवेळी ज्या ठिकाणी जी भूमिका असायला पाहिजे ती भूमिका अगदी दमदारपणे निभवली व पक्षश्रेष्ठींला आपल्या कार्याची चूनुक दाखवली व पक्षाने जी कार्यधुरा सोपवली ती तेवढ्याच सक्षम व भरभक्कमपणे पार पाडून जो विश्वास टाकला तो समर्थपणे पेलला यावरून त्यांची भविष्यातील राजकीय कार्यकीर्द उज्वल आणि प्रशांत महासागरासारखी अथांग असून क्षितिजासारखी अमर्याद राहील एवढे नक्की
विशेष बाब म्हणजे वडील ग्रामपंचायत सदस्य तर भाऊ कोणत्या पक्षात मोठ्या पदावर असतो अशा वेळेस अनेक पदांची फलश्रुती होते पण रोहित भाई यांच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा वारसा नाही व्यापारातून समाजकारण करणे खूप जिकिरीची असते आजकाल आपण बघतोच की निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी जर काम केले तरच राजकीय पक्षातील मंडळी अडीअडचणी सोडवतात असे ऐकिवात आहे पण रोहित भाई यांच्याकडे एखादा व्यक्ती ने अडचणीची मांडणी केली तर कोणत्या पक्षाचा किंवा तो आपला मतदार आहे की नाही याचा विचार न करता त्या व्यक्तीची अडचण कशी सुटेल यावर त्यांचा भर असतो म्हणूनच की काय वाढदिवसाला गावातील असंख्य तरुण तर होतेच शिवाय जेष्ठ नागरिक व महिला मंडळ सुद्धा यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आले होते नक्कीच त्यांनी केलेल्या राजकीय कामगिरीमुळे व वाटचालीमुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी तर्फे मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकते
