बिहाडी,भारसिंगी व पारडी रोडचे नूतनीकरण करा; अन्यथा चक्का जाम आंदोलनाचा इशारा,संभाजी ब्रिगेड व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याला निवेदन.

कारंजा (घा):- दिनांक २१/११/२०२२ रोज सोमवारला नागरीकांच्या समर्थनाने संभाजी ब्रिगेड व शिवसेना पार्टीच्या नेतृत्वात बिहाडी, भारसिंगी व पारडी रोडचे नूतनीकरण करण्याबाबत तहसिलदार गिरी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले. गेल्या ३ वर्षापासून वरील तिन्ही रोडची परिस्थिती फारच वाईट झालेली आहे.त्या रोडवर जागोजागी खड्डे पडलेले आहे.अनेक गावांना जोडणाऱ्या या तिन्ही रोडवरून शाळेतील विद्यार्थी सुद्धा जाणेयेणे करतात.त्या रोडवरून जाणाऱ्या सर्वच नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एखादी वेळा जीवितहानी होण्याची शक्यता नकारता येत नाही.अनेकदा निवेदने देऊन ही या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असे मत शिवसेनेचे संदीप भिसे,संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर तथा सामजिक कार्यकर्ते विनोद पाटिल यांनी व्यक्त केले.येत्या ८ दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक २९/११/२०२२ ला वॉटर फिल्टर बिहाडी रोड जवळ चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.यावेळी निवेदन देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संदीप भिसे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष पियूष रेवतकर,सामजिक कार्यकर्ते विनोद पाटिल, गजनान बोडखे, प्रमोद पखाले, प्रफुल रेवतकर, विद्याधर रेवतकर, पंकज रेवतकर,विठ्ठल घुमडे, नितिन धूर्वे,सचिन बोडखे, शुभम नासरे,प्रशांत बोडखे, शंकर धांदे आदी इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.