
नाशिक मध्ये अनेक दशकांपासून(75वर्षे) जुने नाशिक परिसरात प्रसिद्ध अशा सीताबाईची मिसळ या हॉटेल च्या मालकीण सीताबाई मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मागील काही महिन्यात सिताबाईंच्या मिसळ ची चव अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील घेतली होती, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नातवाच्या मदतीने त्यांनी नाशिक च्या उच्चभ्रू परिसरात सीताबाईची मिसळ सुरू केली होती आणि नाशिकरांचा त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. तसेच आजींचा मिसळ बनवण्याचा उत्साह पाहून अनेकांना उभारी मिळत असे परंतु मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने आज अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले त्यामुळे नाशिकच्या खवय्यांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.
1
