प्रमोद जुमडे /हिंगणघाट
हिंगणघाट शहरातील प्रभाग क्र. ५ येथे माजी नगरसेवक राजू कामडी व माजी शहराध्यक्ष आशिष पर्बत तसेच संत तुकडोजी वार्ड मधील सर्व नागरिकां तर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभागातील जय बजरंग बली भजन मंडळातर्फ़े भारतराव पुरी आणि मनोहरराव ठाकरे, गोपिका भजन मंडळ व बचत गटातर्फे शोभाताई जिकार, महिमा महिला बचत गटातर्फे जया तळवेकर, संतोषी महिला भजन मंडळातर्फ़े वर्षाताई मंगरूळकर,तेजस्विनी महिला गटातर्फे शालिनीताई कांबळे, इशिता महिला बचतगटातर्फे हर्षाली कोहळे , धनलक्ष्मी महिला बचतगटातर्फे ज्योती कोल्हे, श्रीराम मंदिर सेवा समिती तर्फे आशिष बोबडे, बहुपती गणेश मंडळातर्फे रमेश आहुजा, नवदुर्गा बचतगट व भजन मंडळा तर्फे कोरडेताई, शिक्षक वर्ग, बाल गणेश मंडळा तर्फे प्रज्वल सुरपाभ, चैतन्य स्पोर्टींग क्लब तर्फे यश वाघमारे , जय अंबे माऊली दुर्गा मंडळातर्फे प्रज्वल कडू, श्रीकांत भिमने, चैतन्य शारदा मंडळातर्फ़े प्रवीण राडे, लक्ष्मी भजन मंडळ, संतोषी भजन मंडळ, संजय साळवे परिवार कडून, संजूभाऊ नेहरोत्रा अश्या विविध भजन मंडळ, महिला बचतगटा तर्फे तथा प्रभागातील मान्यवर नागरिकांनी आमदार कुणावार यांना शाल श्रीफळ देत सत्कार केला सत्काराला उत्तर देताना आमदार कुणावार यांनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार माझा नसून तो तुम्हा सर्वांचा असून हा पुरस्कार मी मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला समर्पित करत असल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी किशोर दिघे, नितीन मडावी, सुभाष कुंटेवार, भूषण पिसे, आशिष पर्बत,राजू कामडी ,शरद वाघमारे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यासह रहिवाशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.