
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील फिर्यादी मनीषा विजय झकले यांचा कापूस घरासमोरील असलेल्या टिनपत्र्याच्या खोलीतुन अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याची दिं १२ मार्च २०२३ ला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेत राळेगाव पोलिसांनी २४ तासात कापूस चोरट्याचा शोध लावून बेड्या ठोकल्या आहे.
मनीषा झलके यांचा कापूस घरा समोरील असलेल्या टिन पत्र्याच्या खोलीत भरून होता दिं १२ मार्च ला या खोलीतील दाराचे लॉक तोडून एखादी क्विंटल कापूस चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले या बाबतची तक्रार मनीषा विजय झलके हिने पोलीस स्टेशनला दिली असता राळेगाव पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २४ तासाच्या आत पिंपळखुटी येथील आरोपी सुरेश भगवान मेश्राम वय २५ वर्ष व गौरव बबन झोटिंग वय २३ वर्ष या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे असलेला एक क्विंटल कापूस जप्त करण्यात आला असून आरोपीवर ४६१/३८० भांदवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सुरू राळेगाव पोलीस करीत आहे.
