
नॅचरल शुगर, पुष्पावंती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंज येथील साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, कृषिरत्न बी.बी ठोंबरे यांनी २५६० रू. याप्रमाणे उसाला भाव दिला. परंतु शिऊर शुगर प्रायव्हेट लिमिटेड वाकोडी या कारखान्याने शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. मागील गळीत हंगाम २०२०-२१(१३५रू.प्रति टन) चे बील थकीत आहे. तसेच २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणांनी शिऊर कारखान्यास ऊस दिला. शिऊर येथील साखर कारखाना कर्मचाऱ्यांमार्फत नॅचरल शुगर गुंज या कारखान्याप्रमाणे उसाला भाव देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. व तसे प्रसिद्धी पत्र सुद्धा काढण्यात आले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून ऊस शिऊर कारखान्यास दिला. परंतु अद्याप उसाला २०००+१००=२१०० रू. प्रति टन एवढीच रक्कम हप्त्याच्या स्वरूपात मिळाली आहे. दि.२२.८.२२रोजी शिऊर शुगर प्रावेट लिमिटेड वाकोडी , जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यास निवेदन देऊन उपोषणास बसण्यात आले होते. तीन ते चार दिवस उपोषणास बसल्यानंतर लगेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५.८.२०२२ रोजी २४६०रू.प्रती टन भाव देतो असे सांगून ,शेतकऱ्यांची दिशाभूल करून उपोषण सोडण्यात आले होते. अद्याप पोळा,गणपती, लक्षीम्या या सारखे सन एका मागून एक सण लोटत गेले. परंतु अद्याप उसाचे बिल जमा झालेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात शिऊर साखर कारखान्याविषयी रोश व्यक्त होत आहे .व नाराजीचे सूर निघत आहे . लवकरात लवकर राहिलेली उसाचे बिल रक्कम अदा न करण्यात आल्यास पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येते की काय? असे ढाणकी व आजूबाजूच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे.
