जूनी पेन्शन योजना संघर्ष यात्रेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पाठींबा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जूनी पेंन्शन संघर्ष समन्वय समिती द्धारा आयोजित पेंन्शन संघर्ष यात्रेला व नियोजित सेवाग्राम ते नागपूर पायदळ दिंडीला सक्रिय सहभागासह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या शिक्षकासाठी सहानुभुती बाळगणाऱ्या बलाढ्य संघटनेने जाहीर लेखी पाठींबा दिला असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक अध्यक्ष श्रावणजी बरडे सर व प्रांतिक सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले यांच्या स्वाक्षरीचे पाठिब्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन योजना संघटनेचे राज्याध्यक्ष तथा समन्वय समितीचे निमंत्रक वितेश खांडेकर यांना पाठविण्यात आले असून राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना DCPS ,NPS, लागू आहे ती रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना1982 ची कुटुंब सेवानिव्रुती वेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेकरीता जूनी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्रातील छत्तीस ही जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा आयोजित केली असून या पेन्शन संघर्ष यात्रेची सुरवात सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आझाद मैदान मुंबई येथुन होणार असून ८डिसेंबर २०२१ ला सेवाग्राम येथे समाप्त होणार असून हिवाळी अधिवेशन काळात सेवाग्राम ते नागपूर पायदळ पेन्शन दिंडी काढण्यात येणार आहे. या सक्रिय सहभागाच्या प्रती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार विश्वनाथजी उर्फ व्ही यू डायगव्हाने सर तथा प्रांतिक कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यवाह यांना पाठविण्यात zaआल्याचे यवतमाळ जिल्हाbh अध्यक्ष अशफाक खान सर व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी कळविले असल्याची माहीती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे दिली .