
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव चा निकाल यावर्षी सुध्दा उत्कृष्ट राहिला, ग्रामीण भागातील असंख्य अडचणींवर मात करून निकालात विद्यालयाने बाजी मारली,शाळेचा निकाल तालुक्यात चौथ्या क्रमांकावर असुन सेंटर मधुन पहिला क्रमांक आहे.विद्यालयाचा निकाल 91.66 टक्के असुन दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये आहे, यामिनी येरकाडे 90 टक्के गुण घेऊन झाडगाव केंद्रातुन पहिली आली आहे,तर प्राविण्य सुचित दुसरी विद्यार्थिनी आचल भटकर असुन तिला 75.66 टक्के व गुणानुक्रमे तिसरी विद्यार्थिनी पल्लवी अक्कलवार ही असुन तिला 74.63 टक्के मिळाले आहे आणि प्रथम श्रेणीत 13 विद्यार्थी पास झाले आहे .निकालावर गाडगे महाराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवीभाऊ येंबडवार यांनी समाधान व्यक्त केले सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन केले..
