
उद्या होणार जि.प.ला सत्कार
तालुका प्रतिनिधी/४सप्टेंबर
काटोल – भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.यादिवशी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो.जिल्हा परिषद , नागपूर तर्फे उद्या खेडकर सभागृह , नागपूर येथे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे.
काटोल मधून जि.प.प्राथमिक शाळा, वलनी (डफ्फर) चे मुख्याध्यापक शेषराव देवरावजी टाकळखेडे तर नरखेड तालुक्यातून जि.प.उच्च प्राथमिक शाळा,सावरगांव क्र 1 चे मुख्याध्यापक उत्तम भाऊरावजी मनकवडे यांची निवड झाली आहे
दोघांचेही शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.त्यांच्या निवडीबाबत काटोलचे गटविकास अधिकारी संजय पाटील, नरखेड गटविकास अधिकारी, काटोलचे गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, नरखेडचे विशाल गौर,दिलीप वरोकर, विवेक बोरकर,विजय धवड, दिलीप चांदुरकर, योगेश पराते, दामोधर कुटे, भुषण आगे, विरेंद्र वाघमारे, दिनेश डवंगे, मुरलीधर सातपुते, प्रशांत मनकवडे, शोभा ठाकरे, आरती दिक्षित, पुष्पा कामडी, पुष्पा साठोणे, रेखा आलोडे आदींनी अभिनंदन केले आहे.
