
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत कीन्ही जवादे ता.राळेगांव जी.यवतमाळ येथे गावातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा याची पाहणी करण्यासाठी राज्य स्तरीय समितीने भेट दिली.यवतमाळ जिल्ह्यातील फक्त अकरा गावे निवडण्यात आली, त्यामध्ये राळेगांव तालुक्यातील कीन्ही जवादे या गावाची निवड झाली.समीतीने कामाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच काही महत्वाच्या सूचना केल्या.
यावेळी राज्य शासनाचे अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सचिव ग्रामपंचायत गाणार साहेब (ग्राम विस्तार अधिकारी)
सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे,प्रतिभा मोहर्ले,माला लोणबले,सीमा उईके, कर्मचारी पुंडलिकराव लोणबले, मारुती ईठाळे, भाग्यश्री खैरकार, धनराज तोडसाम, प्रभाग अध्यक्षा दुर्गा वडते,व नागरिक उपस्थित होते.
