
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती करिता नव्याने काढण्यात आलेल्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली असून या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतील ४७ ग्रामपंचायती पैकी २५ ग्रामपंचायती महिला करिता राखीव ठरल्या आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे , निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी तथा निवडणूक विभागीय अधिकारी कर्मचारी या आरक्षण सोडतील दरम्यान उपस्थित होते .
या आरक्षण सोडतील ४७ ग्रामपंचायती पैकी अनुसूचित जाती महिला २ अनुसूचित जाती १ अनुसूचित जमाती महिला ४ अनुसूचित जमाती ३ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग ६ तर सर्वसाधारण महिला १२ तर सर्वसाधारण १२ अशा पद्धतीचे एकूण ४७ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे यामध्ये वडकी अनुसूचित जाती महिला, वनोजा अनुसूचित जाती, रावेरी अनुसूचित जाती महिला, शेळी अनुसूचित जमाती महिला, वालधूर अनुसूचित जमाती, टाकळी अनुसूचित जमाती ,किन्ही (जवादे) वाऱ्हा अनुसूचित जमाती महिला,,करंजी (सो) अनुसूचित जमाती महिला, सावंगी पेरका अनुसूचित जमाती, आष्टा नागरिकांचा मागास प्रवर्ग, कारेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, बोरीइचोड नागरिकांचा मागास प्रवर्ग, कळमनेर नागरिकांचा मागास प्रवर्ग, झाडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अंतरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चिखली (व ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पिंपरी (सा) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, श्रीरामपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ,धानोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग, भीमसेन्पूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, उंदरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ,आष्टोना सर्वसाधारण, भांब सर्वसाधारण , चाहांद सर्वसाधारण, दहेगाव सर्वसाधारण महिला, धुमक चाचोरा सर्वसाधारण, गुजरी सर्वसाधारण महिला,खडकी सर्वसाधारण महिला ,खैरी सर्वसाधारण मेंगापूर सर्वसाधारण महिला, निधा सर्वसाधारण, नागठाणा सर्वसाधारण महिला, पिंपळापूर सर्वसाधारण, पिंपळखुटी सर्वसाधारण ,रिधोरा सर्वसाधारण ,रामतीर्थ सर्वसाधारण महिला, सराई सर्वसाधारण, वाढोनाबाजार सर्वसाधारण महिला, वेडसी सर्वसाधारण ,येवती सर्वसाधारण महिला, झुलर सर्वसाधारण महिला, सावनेर सर्वसाधारण, पिंपळगाव सर्वसाधारण महिला, जागजई सर्वसाधारण महिला ,बंदर सर्वसाधारण महिला, याप्रमाणे सर्व आरक्षण सोडत काढण्यात आली आहे यावेळीतालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
