राळेगाव येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

राळेगाव तालुका ग्राहक पंचायत शाखेद्वारे जागतिक ग्राहक दिन प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राळेगाव तालुका ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के एस वर्मा होते. यावेळी उपाध्यक्ष शोभाताई इंगोले, उपाध्यक्ष डॉ. अश्विनी थोडगे, कोषाध्यक्ष भूपेंद्र कारिया व प्रशिक्षण केंद्राचे केंद्रप्रमुख आशिष इंगळे हजर होते.
ग्राहक जागृतीच्या या कार्यक्रमात या ठिकाणी प्रशिक्षु विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायतच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. प्लेसमेंट असोसिएट गणेश बोरकर यांनी बहारदार संचालन केले.केंद्र प्रमुख आशिष इंगळे यांनी उपस्थितांचा सुरेख परिचय करून देऊन आभार मानले. या ठिकाणी ग्राहक जागृतीची प्रदर्शनी सुद्धा लावण्यात आली होती.