हिंदू सण उत्सवावर बंदी घालणाऱ्या सरकार विरोधात मनसे चे ढोल बजाओ आंदोलन आयोजन

हिंदू सणावर बंदी घालून राजकीय निषेध ,सभांचे आयोजनावर बंदी न घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 वाजता ढोल बजाओ आंदोलन करीत सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार मनविसे,जिल्हाध्यक्ष महिलासेना सुनिता ताई गायकवाड ,शोभाताई वाघमारे,महिलासेना उपजिल्हाध्यक्ष,राजूभाऊ कुकडे ,जिल्हाउपाध्यक्ष किशोरभाऊ मडगुलवार जिल्हासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन होणार आहे.