
इमडे यांच उमरखेड महागाव दोन्हीही तालुक्यात नात्यांचे जाळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमरखेड – महागाव विधानसभा अध्यक्ष पदी बंदी भागातील तरुण, तडफदार नेतृत्व बोरगावचे उपसरपंच कृष्णा इमडे यांची नियुक्ती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हाचे निरीक्षक अफजल फारुखी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. जिल्हाचे नेते बाजोरीया साहेब, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष पंडागळे साहेब, युवक चे जिल्हाध्यक्ष राहूल भाऊ कानारकर साहेब या सर्वांचे त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व आमच्या भागातील तरुण नेतृत्वाला चांगल्या पदावर संधी दिल्यामुळे आगामी काळात होणार्या निवडणूकांमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी बंदी भागातील सर्व जनता उभी आहे अशी प्रतिक्रिया या भागातील जेष्ठ मंडळींनी बोलून दाखवली. विधानसभा युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले कृष्णा इमडे यांनी बोलताना सांगितले मागील सात ते आठ वर्षीपासून राजकारणात काम करत असतांना मी जोडलेली तरूणांची फळी सध्या सक्रीय राजकारणात आहेत त्यामध्ये बंदी भागातील व उमरखेड,महागाव तालुक्यातील 60 ते 65 ग्रामपंचायतीमध्ये त्यापैकी 200 पेक्षा अधिक सहकारी मित्र पद अधिकारी म्हणून काम करतात ती सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
त्यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली सर्वांनी मला वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच मला इथपर्यंतचा प्रवास करता आला. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष वाढवण्यासंदर्भात सदैव तत्पर राहील.
गोरगरीबाचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य होईल हा विश्वास देतो.आत्ता पर्यंतच्या राजकिय व सामाजिक कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्या सर्व मित्र व सहकार्यांनी साथ दिली त्या सर्वांचे इमडे यांनी आभार व्यक्त केले.
