

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकांच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील गड किल्ल्यांची मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छता हीच सेवा मोहीम राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी याच्या सहभागातून अभियान राबविले जात आहे त्या अनुषंगाने कौशल्य उधोजक्ता, रोजगार व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आले असून राळेगांव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारला ला सकाळी १० ते ११ या वेळात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी व येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेच्या सर्व परिसराची साफसफाई करण्यात आली.
या अभियानाची सुरुवात संस्थेचे प्राचार्य पी पी पवार यांच्या उपस्थिती करण्यात आली असून यावेळी रूपा भिवनकर ,प्रतीक्षा अजमिरे,राजेंद्र पवार,ताराचंद तडस, स्वप्नील राऊत,उर्मिला सावळे,दीक्षा आंबाडकर,कोमल अवधूत, विद्या बकले, नेहा कळमेघ,धारणा नेवारे,वैष्णवी केवते,शामल वडे,जयश्री हिवरे,स्नेहा मंथनवर,अमर झात्ते अर्जुन वाघडे, राजेश मंगले, निलेश कुबडे,नितीन कोरडे,योगेश उमरे, कानायलाल कोंडावे,प्रिविन ठाकरे,अमीर कुरेशी,मोहन नाकतोडे,इंद्रजित लभाने, गजानन ठाकरे,हेमंत तिजारे आदी सर्व कर्मचारी वृंद व विध्यार्थी/विद्यार्थिनी नी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन सर्वांनी परिसर स्वच्छते करिता एक तास श्रमदान केले.
