
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोग च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी 17 वा गाजरगवत जागरूकता सप्ताह आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे साजरा केला.
16- 22 ऑगस्ट गाजरगवत जागरूकता म्हणून साजरा केला जातो. गाजरगवत म्हणजेच पार्थेनियम ला देशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने जसे की काँग्रेस ग्रास, नक्षत्र फुल, पांढरी फुली ओळखतात, या तणाचे पाने गाजराच्या पानाप्रमाणे दिसतात म्हणून त्याला गाजरगवत या नावाने ओळखले जाते. गाजरगवत कोणत्या ठिकाणी उगवते गाजरगवताचा प्रसार कसा होतो, गाजरगवताची ओळख, भारतामध्ये गवताचा प्रसार, गाजर गवतामुळे होणारे दुष्परिणाम, गाजरगवताचे नियंत्रण, इत्यादी विषयांवर 10 वी तील विद्यार्थ्यांशी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी संवाद साधला व माहिती दिली.
कार्यक्रमामध्ये कु. रूषाली पवार, कु. रिया गेडाम, कु. मोनाली गावंडे, कु. तन्वी देशमुख, कु. अदिती दीक्षीत, 3. ईशा ढोक, कु. नुपूर बिसेन आणि कु. तेजस बोरकर या विद्यार्थीनींचा समावेश होता. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार सर डॉ. आर. वी. महाजन सर, आनंद माध्यामिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे मॅम तसेच इतर शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले.
