
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव जिल्हा परिषद यवतमाळ प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुका स्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.यापैकी वरध केंद्रातील सराटी व लोणी व चोंडी या तिन्ही शाळेचा स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग होता त्यापैकी सराटी व लोणी शाळेला यशापर्यंत पोहचता आले असून या शाळांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून या विजयाचे श्रेय वरध केंद्रातील केंद्रप्रमुख वैरागडे सरांना जात असून ही विजयश्री खेचून आणण्यासाठी भादिकर सर,घायवाटे सर, ऋषिकेश काळे सर जुनुनकर मॅडम आकांक्षा मॅडम, बरडे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले असून गटशिक्षणाधिकारी राजू काकडे सर, विस्तार अधिकारी दाभाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे केंद्रप्रमुख वैरागडे सरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
