
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांना अटक झालीच त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणारया पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.. हा सरळ सरळ पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता.. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटली.. मराठी पत्रकार परिषदेने या विषयाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन उद्या राज्यभर आंदोलन करण्याचे ठरविले होते.. विविध पत्रकार संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत अटकेचा निषेध करून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला गेला होता.. मात्र ती वेळ आली नाही.
पत्रकार संघटनांचा आक्रमक पवित्रा आणि पत्रकाराच्या संतप्त भावना विचारात घेऊन सरकारला माघार घेत गोविंद वाकडे यांची रात्री उशीरा सुटका करावी लागली.. पत्रकार एकत्र आले तर काय होऊ शकते हे पुन्हा दिसून आले आहे..
पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबददल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत…… अशी माहिती..विजय जोशी….कोषाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद…मुंबई यांनी दिली आहे..
