
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सद्या स्तिथीत राळेगाव तालुक्यातील एकही रेती घाट सुरु न झाल्याने तालुक्या लगत असलेल्या मारेगाव तालुक्यातील सोईट-कोसरा घाट लिलाव झाला असून सदर घाटा वरून यवतमाळ जिल्हात रेती उपलब्ध होत आहे परंतु प्रती ब्रास सहा हजार रुपये किंमत असल्याने ग्राहकाला घरपोच येई पर्यंत आठ ते नऊ हजार रुपये प्रति ब्रास एवढे पैसे मोजावे लागत असल्याने गरजू घरकुल लाभार्थी व ग्रामीण भागातील खाजगी बांधकाम करणार्यांना मोठी अडचन निर्माण झालेली आहे.
रेती घाट लिलाव होणार व योग्य दरात रेती उपलब्ध होणार या प्रतीक्षेत असणाऱ्या घरुकुल लाभार्थ्यान कडे पर्याय शिल्लक राहलेला नाही.शासनाने रेती घाट लिलाव करून सुद्धा ग्राहकांना कुठलाही फायदा होत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
रेती दरांमध्ये वाढ ही रॉयल्टी वाढल्यामुळे झाली आहे, ज्यामुळे घर बांधणी आणि इतर बांधकामांचा खर्च वाढला आहे. बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे. या दरवाढीमुळे, अनेक घरकुल प्रकल्प प्रभावित झाले आहेत आणि घरकुलांसाठी मोफत रेती मिळण्याची घोषणा कागदावरच राहत असल्याचे दिसत आहे..
