पठयाने शेती केली ती पण गांजाची ,बिटरगाव पोलिसांची चमकदार कामगिरी ,दोन आरोपी अटकेत

ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी


ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदिप पडावी यांना मिळतात त्यांनी ही माहिती बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना दिली. प्रताप भोस यांनी सूत्रे हलवत संतोष वाडी शेत शिवारात शेतामध्ये अवैधरित्या लागवड केलेल्या गांजा शेती वर धाड टाकून आनंद गोवर्धन जाधव, व उल्हास रतन जाधव या दोन आरोपींना अटक केली.
सदर शेताचा पंचनामा केला असता 277 गांज्याची झाडे त्यांचे वजन 266 किलो व किंमत सोळा लाख वीस हजार रुपये आढळून आली. सदर दोन्ही आरोपी विरुद्ध बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 285/2022 एन डी पी सी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पडावी, यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, गजानन खरात, रवी गीते, मोहन सचाटे , विद्या राठोड, सतीश चव्हाण, दत्ता कुसराम, निलेश भालेराव, मोसिन पठाण, महागावचे मुन्ना आडे, मोजमाप अधिकारी शंकर हरणे, उमरखेडचे आरसीपी पथक, होमगार्ड चंद्रमणी वाढवे, जीवन महाजन यांनी केले. पुढील तपास सुरू आहे.