सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक १ आक्टोंबर २०२५ रोजी विद्यार्थी भौतिकशास्त्र संघटनेचे पुनर्गठन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. वाय. शेख यावेळी शेख यांनी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून शैक्षणिक प्रगतीसोबतच आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन या कार्यक्रमा प्रसंगी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. डी. जगताप आणी गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. व्हि. गोरे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी भौतिकशास्त्र संघटनेच्या कार्ययोजनेबद्दल माहिती देताना आगामी वर्षात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. यात गेस्ट लेक्चर्स, विज्ञानप्रदर्शन, प्रोजेक्ट स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, शैक्षणिक औद्योगिक सहल तसेच करिअर मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉ. बी. एच. भट्टी यांनी केले. समारंभाच्या शेवटी ए. एस. लिहितकर यांनी मान्यवर व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या पुनर्गठनामुळे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक उपक्रमांना नवे व्यासपीठ उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा ठाम विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.