
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे. अनेक ठिकाणी पतंग प्रेमी यानिमित्ताने आपल्याला पतंग उडविताना दिसतात पण पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा धागा वापरतात यामुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. अनेक वेळा हा धागा दुचाकी चालकाच्या गळ्यामध्ये अटकून अपघात तर घडले शिवाय मृत्यू सुद्धा ओढवल्याच्या बातम्या आपण काही मागील दिवसात वाचल्या आहेत.

तसेच नायलॉन मांजा आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षाला सुद्धा याचा त्रास होतो त्यांच्या पायामध्ये हा मांजा अटकून त्यांना इजा होते.
तेव्हा पतंग प्रेमींनी हा मांज्या वापरताना नक्कीच पक्षाच्या उंच भरारी मध्ये व्यत्यय येणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यायला हवी . यामुळे अनावधानाने एखाद्या वेळेस पक्षाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. याच कारणामुळे प्रशासनाने या धाग्यावर प्रतिबंध आणला आहे. नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा पतंग उडवणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. ग्रामीण आणि शहरांमध्ये सुद्धा लहान मुले, तरुण मंडळी, व वृद्ध मंडळी, सुद्धा पतंग उडवण्याचा छंद जोपासतात याच कारणामुळे मजबूत मांजा पतंगाला असावा अशा उद्देशाने नायलॉन धागा हा मजबूत असल्याकारणाने या धाग्याच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसत आहे. व अशाच धाग्यांना पतंग प्रेमी सुद्धा पसंती देत असल्याकारणाने नायलॉन मांजा विक्रीत वाढ होताना दिसत आहे. तसेच शहरात विविध रंगाचे पतंग विक्रीला तर आलेच शिवाय काही पतंग प्रेमी स्वतः पतंग बनवताना दिसत आहेत. कितीही आधुनिकतेचा काळ आला तरी पतंग बनवण्याचे साहित्यात बदल झालेला दिसत नाही. नक्कीच थोडाफार बदल झाला असला तरी आधुनिकतेला जुनी साथ पतंग बनविताना दिसत आहे. याआधी वेळूच्या कमड्या चा वापर पतंग बनवताना होत होता ती परंपरा आजही कायमच आहे. आणि काही वर्षांपूर्वी साध्या मांज्याचा वापर होत होता पण आता बाजारामध्ये व पतंग प्रेमी मध्ये नायलॉन मांजा या ची मागणी पतंगप्रेमी करताना दिसत आहेत. पण या मांजा मुळे अनेक अपघात होत आहे. रस्त्यावर पतंग उडविताना अनेक दुचाकी वाहनांना व येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा त्रास होतानाच्या घटना बघितल्या आहे. नायलॉन धागा अत्यंत मजबूत सूक्ष्म असतो. त्यामुळे नजरेने दिसण्यास दुरापास्त असतो त्यामुळे हा मांजा प्राण्यांसाठी आणि सर्वांसाठी घातक असल्याकारणाने पर्यावरण व पक्षी प्रेमींनी हा मांजा वापरू नये व प्रशासनाने सुद्धा यावर बंदी आणली आहे.
