
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहर व तालुक्यात हजारो शेतकरी व पशुपालक आपले उदरनिर्वाह पशुधनावर चालवत असताना अद्याप स्वतंत्र व सुसज्ज पशुवैद्यकीय उपचार केंद्र उपलब्ध नसणे ही प्रशासनाची गंभीर उदासीनता असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला लेखी निवेदन देत तात्काळ पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे.
सध्या राळेगाव तालुक्यात पशुवैद्यकीय सुविधा अपुऱ्या असून, डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे पशुपालकांना खासगी उपचारांवर मोठा खर्च करावा लागत आहे. अनेक वेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने जनावरांचा मृत्यू होत असून, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच असल्याचा थेट इशारा शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, पशुधन हे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असून त्यांच्या जीवाशी खेळ करणारी ही उदासीनता आता सहन केली जाणार नाही. तातडीने राळेगाव येथे सुसज्ज पशुवैद्यकीय उपचार केंद्र, आवश्यक डॉक्टर, कर्मचारी व औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा ठाम इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जानराव गिरी , भानुदास राऊत , इम्रान पठाण , प्रतीक बोबडे, ॲड.योगेश ठाकरे ,गणेश कुडमेथे , अनिल डंभारे , दीपक येवले ,जीवन रामगडे , मयुर जुमळे, सागर वर्मा, गोविंदराव काळे, प्रफुल्ल ननावरे, दिवाकर जवादे , भानुदास महाजन, सुनील सावरकर,चांदखाभाई कुरेशी, राहुल पाटील , दत्ताजी झाडे,प्रदीप नेवारे,अरुण शिरोळे ,मनोहर बोरकर पार्थ काकडे , महेश राऊत , गीतेस अलंबकर इत्यादी उपस्थित होते.
