
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
शासनाने मागे घोषणा केल्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून सहकार विभागाच्या माध्यमातून सोसायट्यांना कर्जमाफीची माहिती मागितली जात आहेत पण त्या माहितीमध्ये केवळ थकित असलेल्या कर्जदाराचीच माहिती मागितली जात असल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याही कर्जमाफीमध्ये पुन्हा एकदा ठेंगाच मिळेल का अशी भीती नियमित कर्जदारांच्या मनामध्ये आहेतlllll जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतात अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाते राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी यांची संख्या मोठी असते सद्यस्थितीत युद्ध पातळीवर सोसायट्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागितली जात आहेत सोसायट्यांना कर्जमाफीच्या माहितीचा जो फॉर्म भरून द्यायचा आहे त्यात’ ए’ कॉलम मध्ये केवळ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांचीच माहिती भरावयाची आहे याच फॉर्ममध्ये “बी “हा कॉलम आहे त्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याविषयी माहितीचा कॉलम आहे पण आता केवळ थकीत कर्जदारांचीच माहिती मागितल्याने निश्चितच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहेत प्रत्येक कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्यायच झाला आहेत त्यांना आजतागायत कुठलीही माफी मिळाली नाही मागील कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50000 रुपयाचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले पण त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही वास्तविकताहा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या भरोशावरतीच बँका ह्या तग धरून आहेत पण प्रत्येक कर्जमाफीमध्ये मात्र त्यांनाच डावलण्यात येते. आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे आम्ही गुन्हा करतो का? अशी भावना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे ज्याप्रमाणे थकीत कर्जदारांना कर्जमाफी होते थकीत कर्जदारांचा सातबारा कोरा होतो तशाच पद्धतीचा सातबारा कोरा तशाच पद्धतीची कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळावी अशी रास्त मागणी त्यांची आहे थातूरमातूर प्रोत्साहन पर अनुदान देऊन त्यांची बोळवण केली गेल्यास भविष्यात कुठलाही शेतकरी कर्ज भरणार नाही अस्मानी तसेच सुलतानी संकटामुळे त्याचबरोबर काही अडचणी आल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही परिणामी तो थकीत होतो पण काही शेतकरी असे असतात की ते कितीही अडचणी आल्या तरी ते कर्ज भरतात व नियमित राहतात पण वारंवार त्याच्याच तोंडाला पान पुसली जाणार असेल तर ते सुद्धा भविष्यात कर्ज भरणार नाही त्यामुळे या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा थकीत कर्जदारासारखीच वागणूक मिळावी व त्यांचे सुद्धा सर्व कर्ज माफ होईल अशी भावना सर्व सामान्य शेतकऱ्यांची आहे मोठ्या उद्योगपतींचे अब्जो रुपयांचे कर्ज सरकार राईट ऑफ करतात तेव्हा ते बरोबर असतात व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची वेळ आली की नियम, अटी ,थकीत नियमित अशा अटी घालून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी केली जाते व्यापाऱ्यांना एक न्याय व शेतकऱ्यांना दुसरा हे बरोबर नाही सरकारने सुद्धा कर्ज कर्जमाफीची घोषणा करताना असे म्हटले होते की 30 जून 2026 ला यासाठीच आम्ही कर्जमाफी देत आहोत की 31 मार्च 2026 ला शेतकरी कर्ज भरणार नाहीत ते थकीत होतील व त्यांना आपण कर्जमाफी देऊ त्यामुळे यावेळेस कुठल्याही नियम अटी न लावता सरकारने आश्वासन दिल्यानुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून यावेळेस ऐकू येत आहे
