शिक्षक व स्थानिक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा:निंगनूर येथील नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

प्रतिनिधी :प्रवीण जोशी. ढाणकी


निगंनूर येथील जिल्हा परिषद शाळा ,व महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचे शिक्षक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा अशी तक्रार निंगनूर येथील नागरिकांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .
मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले . विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देणारे शिक्षक आता शाळा सुरु झाल्यानंतर बाहेरगावहून येणे – जाणे करतात, निंगनूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचे एकही शिक्षक मुख्यालयी हजर राहत नसल्याने आधीच अभ्यासात मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे शिक्षकांचे लक्ष नसल्याने
पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे . विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन मुख्यालयी वास्तव्यास न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कार्यवाही करावी अशी निंगनूर येथील सामाजिक कार्यकर्ते मैनोद्दिन सौदागर यांच्यासह पालक मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे .