महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सर्व महिलांना सर्व बसेस मध्ये आज पासून 50 टक्के सवलत.

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी : संदीप जाधव


आज दिनांक 17/03/ 2023. रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी सर्व महिलेसाठी 50 टक्के सवलत ही योजना चालू केली. सदर सवलती पोटी येणारी रक्कम, मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याच्या कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये, म्हणून आणि महामंडळात शासनाकडून मिळणारी प्रतिपूर्ती, अचूक मिळावी याकरता, आगार लेखाकर यांनी त्यांचे लेखापरीक्षण करावयाचे आहे, महिला सवलती संदर्भात हिशोब, तपासणी, लेखा परीक्षणाची पद्धत याबाबतीत, सूचना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे लेखा शाखेद्वारे निर्गमित करण्यात येत आहे.
विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखा अधिकारी, विभागीय आगार अधिकारी, पगार लेखाकर ,स्थान प्रमुख यांच्या बैठका आयोजन करून, सदर सवलती बाबत सविस्तर सूचना द्याव्यात. आगार व्यवस्थापन आणि प्रस्तुत सवलतीची माहिती सर्व पर्यवेक्षक कर्मचारी, चालक वाहक यांना व्हावी या हेतूने कर्मचारी सूचनाफलक, रोकड तिकीट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी फलक सूचना इत्यादी सदर सवलती बाबत माहिती वाचनीय व दर्शनीय स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी, वर्तमानपत्रातून सदर सवलती बाबत प्रसिद्धी देण्यात यावी. महाव्यवस्थापक वाहतूक यांनी आज लेखी स्वरुपात माहिती दिली.