
सध्या वातावरणात बदल झाला असल्याने राळेगांव येथील सीसीआय कापूस खरेदी दिं २६ डिसेंबर २०२४ बुधवार ते २९ डिसेंबर २०२४ रविवार या चार दिवसात बंद असणार आहे . तरी शेतकऱ्यांनी वतावरणाचा बदल लक्षात घेता आपला कापूस २९ डिसेंबर २०२४ पर्यंत विक्री करिता आणू नये जर ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस या चार दिवसाच्या कालावधीत सीसीआय कडे विक्री करिता आणल्यास सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः राहणार असून या बाबतची दखल शेतकऱ्यांनी घ्यावी व आपला कापूस चार दिवस विक्री करिता आणू नये असे आवाहन सीसीआय चे प्रतिनिधी राजकुमार बैरवा यांनी कळविले आहे.
