
चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील बऱ्याच दिवसापासून जिल्ह्यातील गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर येथील चोर खिडकी परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोर खिडकी या भागातील रहिवासी सुवर्णा सुखदेवे वय 65 वर्ष या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याने खळबळ माजली आहे.
मृतक महिलेच्या पतीचा महिनाभरापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.या बाबत राम नगर पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास करीत आहे.
